माध्यमिक स्तरावरील सहशालेय उपक्रमात सहभाग न घेण्याच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करणे
Author(s): श्री. आशिष सोमनाथ गायकवाड
Authors Affiliations:
उपशिक्षक, मॉडर्न हायस्कूल, बरड तालुका – फलटण, जि- सातारा महाराष्ट्र
DOIs:10.2018/SS/202605001     |     Paper ID: SS202605001सदर संशोधनाचा उद्देश माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सहशालेय उपक्रमांतील, विशेषतः वक्तृत्व स्पर्धेतील सहभागाचा अभाव का आहे हे शोधून त्यावर योग्य उपाययोजना करणे हा आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाणारे शिक्षण महत्त्वाचे मानले जाते. मात्र, इ. ९ वी व १० वी चे अनेक विद्यार्थी आत्मविश्वासाच्या अभावामुळे, योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा मंचभितीमुळे अशा उपक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत. या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी बरड, फलटण येथील मॉडर्न हायस्कूल, बरड या शाळेतील २५ विद्यार्थ्यांवर आधारित वर्णनात्मक व सर्वेक्षणात्मक पद्धतीने हे संशोधन राबवण्यात येणार आहे. संशोधनात मुलाखती, निरीक्षण व प्रश्नावलीच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाईल. संशोधनाच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये सहभाग न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कारणे शोधणे, त्यांना प्रभावी भाषणासाठी प्रेरित करणे, आत्मविश्वास निर्माण करणे व शाळेच्या सांस्कृतिक दर्जात भर घालणे यांचा समावेश आहे. यामध्ये घेतलेल्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्याची शक्यता असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास संशोधक व्यक्त करतो.
श्री. आशिष सोमनाथ गायकवाड (2026); माध्यमिक स्तरावरील सहशालेय उपक्रमात सहभाग न घेण्याच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करणे, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences, ISSN(o): 2581-6241, Volume – 9, Issue – 5, Available on – https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/
१. देशमुख पी. ए. (२०१७) शैक्षणिक मानसशास्त्र, पुणे : नूतन प्रकाशन
२. जोशी एस. व्ही. (२०१५) शाळा व्यवस्थापन व गुणवत्ता विकास, कोल्हापूर : बालचंद्र प्रकाशन
३. कुलकर्णी डी. एम. (२०१९) शाळा व्यवस्थापन व गुणवत्ता विकास, मुंबई : साईनाथ प्रकाशन
४. आपटे व्ही. के. (२०१६) शिक्षणतत्व व शिक्षणप्रक्रिया, नागपुर : यूनिवर्सल पब्लिकेशन
५. बोराडे एम. एस. (२०२०) विद्यार्थी व पालक यांचे मानसशास्त्र, पुणे : प्रगती बुक्स
६. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) (२०२१) Adolescence Education Programme, New Delhi : NCERT Publication
७. रमेश ठाकुर (२०१८) Co-curricular Activities and Student Development, New Delhi : Regal Publication
८. Bhatt P. & Sharma R. (२०२०) Effective School Leadership & Co-curricular Planning, New Delhi : APH Publishing Corporation
९. NCF (२००५) National Curricular Framework, New Delhi : NCERT
१०. Web References:
https://www.education.gov.in
https://www.ncert.nic.in
https://www.unesco.org
https://www.shodhganga.inflibnet.ac.in/
![SHIKSHAN SANSHODHAN [ ISSN(O): 2581-6241 ] Peer-Reviewed, Referred, Indexed Research Journal.](https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/wp-content/uploads/SS-TITLE-HEADER.png)