30, April 2026

जीन जॅक रुसो यांचा सामाजिक कराराचा सिद्धांत आणि लोकशाहीची संकल्पना

Author(s): 1. Lavkumar Chimansing Harami, 2. Rajesh Madhukar Sonkusare

Authors Affiliations:

  1. Assistant Professor (Pol. Sc.), Arts and Commerce Night College, Nagpur
  2. Researcher

DOIs:10.2018/SS/202604006     |     Paper ID: SS202604006


Abstract
Keywords
Cite this Article/Paper as
References
सारांशः आधुनिक राजकीय विचारसरणीच्या विकासामध्ये जीन जॅक रुसो यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. रूसो यांनी व्यक्तीस्वातंत्र्य, समानता आणि लोकसत्तेच्या संकल्पनांना तात्त्विक आधार दिला. रुसो यांचा सामाजिक करार हा ग्रंथ 1762 मध्ये प्रकाशित झाला आणि आधुनिक लोकशाहीच्या तत्त्वज्ञानाला एक नवे वळण मिळाले. त्यांनी मांडलेला सामाजिक करार सिद्धांत हा आधुनिक लोकशाहीच्या पायाभरणीचा एक महत्त्वपूर्ण आधार मानला जातो. रुसो यांच्या मते राज्याची निर्मिती ही लोकांच्या परस्पर करारातून निर्माण झाली असून राजसत्ता ही जनतेकडूनच उद्भवते, म्हणूण शासन व्यवस्था ही लोकांच्या इच्छेवर आधारित असायला पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका होती. रुसो यांच्या मते राज्य आणि समाज यांचा उगम लोकांच्या सामूहिक करारातून झाला आहे. व्यक्तीने आपल्या नैसर्गिक स्वातंत्र्याचा काही भाग समाजाच्या हिताकरिता सोडून दिला आणि त्यातून राज्यव्यवस्था निर्माण झाली. या कराराचा मुख्य उद्देश सर्वांच्या हिताचे संरक्षण करणे आहे. लोकशाही ही अशी शासनपद्धती आहे ज्यामध्ये अंतिम सत्ता जनतेच्या हातात असते. रुसो यांच्या सामाजिक करार सिद्धांतामुळे लोकसत्तेची कल्पना अधिक स्पष्ट झाली आणि आधुनिक लोकशाहीच्या विकासाला बळ मिळाले. या शोधनिबंधामध्ये रुसो यांच्या सामाजिक करार सिद्धांताचे स्वरूप, त्यातील प्रमुख तत्त्वे आणि त्याचा लोकशाहीवर झालेला प्रभाव यांचा अभ्यास केला आहे.
मुख्य शब्दः जीन जॅक रुसो, सामाजिक करार, लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य, समानता.

Lavkumar Chimansing Harami,  Rajesh Madhukar Sonkusare (2026); जीन जॅक रुसो यांचा सामाजिक कराराचा सिद्धांत आणि लोकशाहीची संकल्पना, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences,      ISSN(o): 2581-6241,  Volume – 9,   Issue –  4,  Available on –   https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/

 

संदर्भ ग्रंथ सूचीः

  1. भालेराव, अ. (2015). राजकीय विचारवंत: विद्या बुक्स पब्लिशर्स.
  2. गर्गे, स. मा. (1998). राजकीय विचारप्रवाह: कॉन्टिनेंटल प्रकाशन.
  3. गौबा, ओ. पी. (2012). पाश्चिमात्य राजकीय विचार: मॅकमिलन इंडिया.
  4. चौसाळकर, अ. (2007). पाश्चात्य राजकीय विचारवंत: फडके प्रकाशन.
  5. पाटील, वा. भा. (2010). राजकीय तत्त्वज्ञान: मंगेश प्रकाशन.
  6. Rousseau, J. J. (2002). The Social Contract (G. D. H. Cole, Trans.). New York: Dover Publications.

 


Download Full Paper

Download PDF No. of Downloads:3 | No. of Views: 33