शोध सार : “पालि साहित्यातील दुःख आणि दुःख निवारण एक चिकित्सात्मक अभ्यास” पालि साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे दुःख आणि त्याचे निवारण या विषयाभोवतीच संपूर्ण पालि साहित्य फिरत असल्यास आपल्याला दिसून येते आणि तथागत भगवान गौतम बुध्द यांनी 45 वर्ष जो उपदेश केला तो सुद्धा दुःख आणि त्याच्या निवारण यासंबंधी असल्याचे आपल्याला अभ्यासाला मिळते.
“पालि साहित्यातील दुःख आणि दुःख निवारण एक चिकित्सात्मक अभ्यास” यामध्ये संपूर्ण मानवी शरीरापासून उत्पन्न होणारे तसेच मानवी शरीरच दुःख उत्पत्तीचे मुख्य कारण आहे. जन्म घेणे हेच दुःख आहे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत येणाऱ्या दुःखाचे कारण, दुःख म्हणजे काय, दुःखाचे निवारण आणि दुःख निवारण करण्याचा मार्ग या सर्व गोष्टींचा अभ्यास या शोधनिबंधामध्ये केलेला आहे.
पालि साहित्यामध्ये येणारे दुःखाची संकल्पना ही विविध ग्रंथाच्या आधारे अभ्यासली आहे त्यामध्ये थेरी गाथा या ग्रंथामधील थेरींच्या जीवनातील सर्व समस्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे स्त्री जीवनामध्ये येणारे दुःख आणि त्या दुःखाचे कारण आणि निवारण या सर्व गोष्टींचा अभ्यास या शोध प्रबंधामध्ये केलेला आहे याचा मुख्य विषय हाच आहे की यामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या जीवनामध्ये येणारे दुःख,दुःखाचे कारण, दुःखाचे निवारण, आणि दुःख निवारणाचा मार्ग याविषयी सविस्तर चर्चा आहे दुःखाच्या कारणामध्ये दुःखाचे विविध प्रकार आपल्याला सांगितले आहे जसं की जातिची दुःखा म्हणजे जन्म घेणे दुखत आहे, जरापि दुःखा म्हणजेच म्हातारपण दुःख आहे, व्याधी दुःख आहे.मरण दुःख आहे, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग दुःख आहे, शोक करणे किंवा रडणे हे सुध्दा दुःख आहे आणि तसेच इच्छित न मिळणे हे सुध्दा दुःख आहे अशा प्रकारे दुःखाचे विश्लेषण यामध्ये केलेले आहे.
त्यानंतर यामध्ये दुःख दुःखाचा समुदाय हा कशाप्रकारे आहे याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे तसेच दुःखाचे मूळ कारण तृष्णा आणि अविद्या याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. दुःख आहे तर दुःखाचे कारण आहे आणि दुःखाचे निवारण ही आहे तसेच दुःख निवारण करण्याचा मार्ग सुध्दा यामध्ये सविस्तर सांगितला आहे.
आधुनिक जीवनामध्ये संपूर्ण मानव जातीने दुःखाने घेतलेली आहे आणि दुःख निवारण करण्यासाठी खूप वेगवेगळ्या संस्था वेगवेगळे समाज यावर कार्य करत आहे परंतु अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुध्द यांनी दिलेला दुःख मुक्तीचा मार्ग या दुःखमुक्तीच्या मार्गाची आज आधुनिक विश्वाला नितांत गरज आहे हेच या संशोधनाचे सार आहे.
मुख्य शब्द: पालि साहित्यातील दुःख आणि दुःख निवारण, चार आर्य सत्य, प्रतीत्यसमुत्पाद, आणि आर्य अष्टांगिक मार्ग.
Akash Jain (2026); Representations of Śrī-Lakṣmī in Early India: A Survey of Textual Traditions and Material Remains, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences, ISSN(o): 2581-6241, Volume – 9, Issue – 6, Available on – https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/