27, February 2026

वाचकांच्या पुस्तक निवडीवर बुकस्टाग्राम आणि बुकटॉकचा प्रभाव: एक अभ्यास

Author(s): सौ. रोहिणी घायाळकर, श्री. मंदार लेले, श्री. जगदीश पाठक, श्री. प्रशांत दळवी

Authors Affiliations:

  • Librarian at St Wilfred College of arts commerce and science Shedung Panvel 410221
  • Assistant professor at St Wilfred College of arts commerce and science Shedung Panvel 410221

DOIs:10.2018/SS/202602015     |     Paper ID: SS202602015


Abstract
Keywords
Cite this Article/Paper as
References

गोषवारा (Abstract)

आजकाल सोशल मीडियाने आपल्या आयुष्यात इतकं स्थान मिळवलंय की त्याचा परिणाम आपल्या वाचनावरही होतोय. विशेषतः इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर तयार झालेले बुकस्टाग्राम आणि बुकटॉक हे समुदाय पुस्तकप्रेमींसाठी नवं दालन उघडत आहेत. या अभ्यासात नेमके हेच पाहण्याचा प्रयत्न केलाय की या प्लॅटफॉर्मचा वाचकांच्या पुस्तक निवडीवर कितपत परिणाम होतोय.

या अभ्यासासाठी १२० वाचकांशी संवाद साधण्यात आला. त्यांना प्रश्नावलीद्वारे विचारण्यात आले की ते या प्लॅटफॉर्मवर कितपत सक्रिय आहेत, इन्फ्लुएन्सरच्या शिफारशींवर त्यांचा किती विश्वास आहे आणि पारंपरिक पद्धतींपेक्षा हे नवे माध्यम त्यांना अधिक पटतंय का.

यातून समोर आलेले निष्कर्ष खूपच बोलके आहेत. जवळपास ९० टक्के वाचक या प्लॅटफॉर्मबद्दल जागरूक आहेत. बुकटॉकचा प्रभाव (४५ टक्के) हा बुकस्टाग्रामपेक्षा (४० टक्के) किंचित जास्त जाणवतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ८१.६ टक्के वाचकांनी हे मान्य केलं की इन्फ्लुएन्सरच्या शिफारशींचा त्यांच्या पुस्तक निवडीवर मध्यम ते उच्च प्रभाव पडतो. पारंपरिक स्रोतांशी तुलना करता, ४८.३ टक्के वाचक इन्फ्लुएन्सरच्या शिफारशींना प्राधान्य देतात तर केवळ २६.७ टक्के वाचक ग्रंथपालांच्या शिफारशींना पसंती देतात. हा आकडा विचार करायला लावणारा आहे.

या अभ्यासातून हे स्पष्ट होतं की वाचनाची पद्धत बदलतेय. आता वाचक फक्त ग्रंथालयात जाऊन किंवा वर्तमानपत्रातील समीक्षा वाचून पुस्तक निवडत नाहीत, तर सोशल मीडियावर दिसणाऱ्या आकर्षक पोस्ट, लहान व्हिडिओ आणि त्यातून जाणवणाऱ्या भावनिक जोडीमुळेही पुस्तक निवडतात. अशा वेळी ग्रंथालयांनीही या बदलाचं गांभीर्य ओळखून वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन मार्ग शोधणं गरजेचं आहे.

द्धती, वाचक मार्गदर्शन, ऑनलाइन पुस्तक समुदाय, तरुण वाचक

बुकस्टाग्राम, बुकटॉक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, पुस्तक निवड, वाचनाची सवय, ग्रंथालय, डिजिटल संस्कृती, माहिती शोधण्याच्या पद्धती, वाचक मार्गदर्शन, ऑनलाइन पुस्तक समुदाय, तरुण वाचक

सौ. रोहिणी घायाळकर, श्री. मंदार लेले, श्री. जगदीश पाठक, श्री. प्रशांत दळवी (2026); वाचकांच्या पुस्तक निवडीवर बुकस्टाग्राम आणि बुकटॉकचा प्रभाव: एक अभ्यास, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences,      ISSN(o): 2581-6241,  Volume – 9,   Issue –  2,  Available on –   https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/

१. कुलकर्णी, विशाखा (२०१८). “सोशल मीडियावरची वाचन चळवळ”. लोकसत्ता, १६ नोव्हेंबर २०१८.

२. खोत, आशालता नारायण (२०२५). “मराठी साहित्य आणि आधुनिक तंत्रज्ञान”. अक्षरसूर्य, ८(०४), ४७-५३.

३. गावडे, वसंत (२०२३). “सोशल मीडियाचा अतिवापर वाचन संस्कृतीस घातक”. द करभार, १५ ऑक्टोबर २०२३.

४. (२०१६). “समाज माध्यमांतून वाचन प्रेरणा”. लोकसत्ता, २१ एप्रिल २०१६


Download Full Paper

Download PDF No. of Downloads:6 | No. of Views: 14