25, October 2026

बी.एड. विद्यार्थी-शिक्षकांच्या मानसिक आरोग्य व कल्याणासाठी योग शिक्षणाची भूमिका : एक सर्वेक्षणात्मक अभ्यास

Author(s): डॉ. अर्जुन धोंडीराम पिठे

Authors Affiliations:

गोखले शिक्षण संस्थेचे  शिक्षणशास्त्र महाविद्यालय, संगमनेर,

जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र, भारत

 

DOIs:10.2018/SS/202610009     |     Paper ID: SS202610009


Abstract
Keywords
Cite this Article/Paper as
References
सारांश: सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी-शिक्षकांना शैक्षणिक अभ्यास, प्रात्यक्षिक अध्यापन, पाठनियोजन, छात्रसेवाकाळ, परीक्षा, असाइनमेंट, कौटुंबिक जबाबदाऱ्या  आणि भविष्यातील व्यावसायिक जबाबदाऱ्या अशा विविध परिस्थितींना सामोरे जावे लागते. या परिस्थितींमुळे मानसिक ताण, अस्वस्थता, एकाग्रतेचा अभाव आणि भावनिक असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे शिक्षक शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थी-शिक्षकांच्या मानसिक आरोग्य व कल्याणाला महत्त्व देणे आवश्यक आहे. योग हा शरीर, श्वास, मन आणि आत्मजागरूकता यांचा समन्वय साधणारा भारतीय ज्ञानपरंपरेतील महत्त्वाचा घटक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार योग नियमितपणे केल्यास तणाव कमी करणे, भावनिक संतुलन आणि मानसिक व शारीरिक कल्याणास मदत होऊ शकते. प्रस्तुत अभ्यासात  बी.एड. विद्यार्थी-शिक्षकांच्या मानसिक आरोग्य व कल्याणाच्या संदर्भात योग शिक्षणाची भूमिका जाणून घेतली  आहे. अभ्यासासाठी सर्वेक्षण पद्धतीचा वापर करण्यात आला. नमुन्यासाठी गोखले शिक्षण संस्थेचे  शिक्षणशास्त्र महाविद्यालय, संगमनेर, येथील 30 बी.एड. विद्यार्थी-शिक्षकांची निवड करण्यात आली. माहिती संकलनासाठी संशोधकाने तयार केलेली 15 विधानांची अभिवृत्ती चाचणी वापरण्यात आली. प्रत्येक विधानासाठी “सहमत, अनिश्चित, असहमत” अशी तीन-बिंदू श्रेणी वापरण्यात आली. प्राप्त माहितीचे विश्लेषण वारंवारता, टक्केवारी आणि सरासरी गुणांच्या साहाय्याने करण्यात आले. संकलित  माहितीच्या आधारे विद्यार्थी-शिक्षकांची योग शिक्षणाविषयी एकूण अभिवृत्ती सकारात्मक आढळली. 15 विधानांची एकत्रित सरासरी 2.72/3.00 आढळली. विशेषतः योगामुळे मानसिक विश्रांती, तणाव व्यवस्थापन, भावनिक संतुलन, सकारात्मक विचार आणि आत्मजागरूकता वाढण्यास मदत होते, असा सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला. अभ्यासाच्या आधारे बी.एड. शिक्षक-शिक्षण कार्यक्रमात योग व मानसिक कल्याणविषयक उपक्रमांना स्थान देण्याची आवश्यकता अधोरेखित होते.  
महत्वाचे शब्द: योग शिक्षण, मानसिक आरोग्य, मानसिक कल्याण, अभिवृत्ती, बी.एड. विद्यार्थी-शिक्षक.

डॉ. अर्जुन धोंडीराम पिठे, (2026); बी.एड. विद्यार्थी-शिक्षकांच्या मानसिक आरोग्य व कल्याणासाठी योग शिक्षणाची भूमिका : एक सर्वेक्षणात्मक अभ्यास, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences,      ISSN(o): 2581-6241,  Volume – 9,   Issue –  10,  Available on –   https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/


Download Full Paper

Download PDF No. of Downloads:9 | No. of Views: 24