संत तुकारामाचे अभंगातील वृक्ष विषयक प्रतिमाने
Author(s): श्रीमती अर्चना कृष्णराव सुदामे, डॉ.सविता ज्ञानेश्वर वावगे
Authors Affiliations:
संशोधक विद्यार्थी, श्री. मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर
संशोधक मार्गदर्शक व प्राध्यापक, मराठी विभाग
DOIs:10.2018/SS/202601016     |     Paper ID: SS202601016सारांश : संत तुकाराम महाराजांच्या अभंगकाव्यात निसर्गप्रतिमांना, विशेषतः वृक्षविषयक प्रतिमांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रस्तुत संशोधनात तुकारामांच्या अभंगांमधील वृक्ष, बीज, कोंब, अंकुर, रोप, खोड, पल्लव, फळ, छाया तसेच विविध वृक्षप्रकारांच्या प्रतिमांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. तुकारामांनी वृक्षसृष्टीचा उपयोग केवळ निसर्गवर्णनापुरता मर्यादित न ठेवता मानवी जीवन, भक्तीमार्ग, कर्मफळसिद्धांत, आत्मशुद्धी व ईश्वर–भक्त संबंध स्पष्ट करण्यासाठी प्रतीकात्मक पातळीवर केला आहे. बीज–वृक्ष या प्रतिमानातून सृष्टीचे चक्र, भक्त व देव यांचे परस्परसंबंध, तसेच शुद्ध कर्मांचे शुभ फलित आणि अशुद्ध कर्मांचे दुष्परिणाम त्यांनी प्रभावीपणे मांडले आहेत. कोंब, अंकुर व रोप यांच्या प्रतिमांद्वारे भक्तीतील सातत्य, साधनेचा विकास आणि आत्मिक उत्कर्ष यांचे सूचक दर्शन घडते. वृक्षाच्या छायेप्रमाणे ईश्वरकृपेचा आधार, तसेच फळ न चाखणाऱ्या वृक्षातून निःस्वार्थ सेवेचा आदर्श तुकाराम स्पष्ट करतात. चंदन, आपटा, वड, पिंपळ, तुळस, निंब, बाभूळ इत्यादी विविध वृक्षांचे संदर्भ मानवी गुण-दोषांशी जोडलेले दिसतात. अशा प्रकारे वृक्षविषयक प्रतिमांच्या माध्यमातून संत तुकाराम मानवी जीवनाला नैतिक, आध्यात्मिक व तत्त्वज्ञानात्मक दिशा देतात.
श्रीमती अर्चना कृष्णराव सुदामे, डॉ.सविता ज्ञानेश्वर वावगे (2026); संत तुकारामाचे अभंगातील वृक्ष विषयक प्रतिमाने, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences, ISSN(o): 2581-6241, Volume – 9, Issue – 1, Available on – https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/
![SHIKSHAN SANSHODHAN [ ISSN(O): 2581-6241 ] Peer-Reviewed, Referred, Indexed Research Journal.](https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/wp-content/uploads/SS-TITLE-HEADER.png)