30, January 2026

वारली आदिवासी लोकगीतांमधील जीवनदृष्टी व सांस्कृतिक मूल्ये : एक अभ्यास

Author(s): निशा यशवंत कासारे

Authors Affiliations:

1Assistant Professor, Birla College of Arts, Science & Commerce, Kalyan, India

2 Assistant Professor, Smt. Smita Ravindra Ghodvinde Law College, Shahapur, India

DOIs:10.2018/SS/202601012     |     Paper ID: SS202601012


Abstract
Keywords
Cite this Article/Paper as
References

वारली आदिवासी समाज हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने वास्तव्यास असलेला एक प्राचीन आदिवासी समाज आहे. या समाजाची सांस्कृतिक ओळख त्यांच्या लोककला, लोकपरंपरा तसेच विशेषतः लोकगीतांमधून ठळकपणे व्यक्त होते. वारली लोकगीते ही समाजाची जीवनदृष्टी, सामाजिक नातेसंबंध, धार्मिक श्रद्धा व सांस्कृतिक मूल्ये व्यक्त करणारे प्रभावी माध्यम आहे.

सदर संशोधनाचा मुख्य उद्देश वारली आदिवासी लोकगीतांमधील जीवनदृष्टी व सांस्कृतिक मूल्यांचा सखोल अभ्यास करणे तसेच आदिवासी मौखिक परंपरेचे दस्तऐवजीकरण करण्यास शैक्षणिक योगदान देणे हा आहे. हे संशोधन गुणात्मक स्वरूपाचे असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण वारली आदिवासी वस्त्यांमधून निवडलेल्या ८० प्रतिसादकांकडून प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली आहे. संशोधनासाठी संरचित मुलाखती, प्रत्यक्ष निरीक्षण आणि निवडक लोकगीतांचे आशय विश्लेषण ही साधने वापरण्यात आली असून वर्णनात्मक व विश्लेषणात्मक संशोधन रचना अवलंबण्यात आली आहे.

अभ्यासातून असे आढळून येते की वारली लोकगीतांमध्ये सामूहिक जीवनपद्धती, निसर्गाशी असलेले अतूट नाते, श्रमप्रधान जीवनशैली, निसर्गाधारित धार्मिक श्रद्धा तसेच सहकार्य, साधेपणा व नैतिकतेवर आधारित मूल्यव्यवस्था ठळकपणे प्रतिबिंबित झालेली आहे. वारली लोकगीते ही केवळ सांस्कृतिक अभिव्यक्ती नसून समाजाच्या जीवनदृष्टीचे व आदिवासी ज्ञानपरंपरेचे जिवंत दस्तऐवज असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होते.

वारली आदिवासी समाज, लोकगीते, जीवनदृष्टी, सांस्कृतिक मूल्ये, आदिवासी लोकसाहित्य, पालघर जिल्हा.

निशा यशवंत कासारे (2026); वारली आदिवासी लोकगीतांमधील जीवनदृष्टी व सांस्कृतिक मूल्ये : एक अभ्यास, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences,      ISSN(o): 2581-6241,  Volume – 9,   Issue –  1,  Available on –   https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/


Download Full Paper

Download PDF No. of Downloads:7 | No. of Views: 35