20, April 2025

भारतीय ज्ञान प्रणालीच्या संवर्धनामध्ये ग्रंथालयाची भूमीका

Author(s): प्रा.तानाजी शिवाजी माळी, डॉ.राहुल कल्याणराव देशमुख, डॉ. नवनाथ महादेव सरोदे,

Authors Affiliations:

. ग्रंथपाल, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲड रिसर्च,पुणे, महाराष्ट्र

. ग्रंथपाल, शिक्षण महर्षी रा.गो. शिंदे महाविद्यालय, परांडा, धाराशिव, महाराष्ट्र

. क्रीडा संचालक, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲड रिसर्च,पुणे, महाराष्ट्र

DOIs:10.2018/SS/202504005     |     Paper ID: SS202504005


Abstract
Keywords
Cite this Article/Paper as
References
सारांशः अनादी काळापासून सुरू झालेली भारताची प्राचीन ज्ञान परंपरा आज ही विश्वाला प्रेरित करणारी आहे. भारतीय ज्ञान परंपरा हा एक अत्यंत विविधता आणि घनतेचा अनुभव आहे .या मध्ये वेदांचे तात्विक विचार, उपनिषदांचे अध्यात्मिक मार्गदर्शन, रामायण- महाभारताच्या कहाण्या, पुराणातील तत्त्वज्ञान, जैन सूत्रे, बौद्ध पदे, पिटके, मध्ययुगीन संतांचे साहित्य, विद्वानांचे संशोधन यामुळे आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रधान युगात भारतीय ज्ञान परंपरेचे महत्त्व अधिक वाढले आहे. विज्ञानाने तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच मानवी मूल्य, नैतिकता, सामाजिक न्याय, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही परंपरा आपल्याला मार्गदर्शन ठरते. पारंपरिक ज्ञान म्हणजे अनेक पिढ्यांनी संकलित केलेले व  समाजामध्ये पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होणारे ज्ञान. हे ज्ञान लोकसंस्कृती, साहित्य, इतिहास, आरोग्य, शेती, हस्तकला, वैद्यकीय उपचारपद्धती, निसर्गोपचार, योग, वेद-शास्त्र इत्यादी विविध क्षेत्रांशी संबंधित असते. या पारंपरिक ज्ञानाच्या संवर्धनामध्ये ग्रंथालये महत्त्वाची भूमिका बजावतात.या लेखात पारंपरिक ज्ञानाची संकल्पना, त्याचे महत्त्व, भारतातील पारंपरिक ज्ञानाच्या संवर्धनामध्ये ग्रंथालये आणि माहिती केंद्रांची भूमिका यावर चर्चा केली आहे. ग्रंथालये आणि माहिती केंद्रे याद्वारे पारंपारिक ज्ञान जतन करण्यासाठी राबविले जाणारे विविध उपक्रम, पारंपारिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण, पारंपारिक ज्ञानाचे कॅप्चर/रेकॉर्डिंग, पारंपारिक ज्ञानाचे मायक्रोफिल्मिंग, पारंपारिक ज्ञानाचे डिजिटायझेशन आणि पारंपारिक ज्ञानाची उपलब्धता वाढविण्यासाठी डिजिटल भांडारे तयार करणे इ. ग्रंथालये केवळ पुस्तके संग्रहित करणारी ठिकाणे नसून ती पारंपरिक ज्ञानाचे संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रंथालये पारंपरिक ज्ञानाचे डिजिटायझेशन करून ते भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवू शकतात. त्यामुळे पारंपरिक ज्ञानाच्या जतनासाठी आणि प्रचारासाठी ग्रंथालयांचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होणे आवश्यक आहे.भारतात विविध ग्रंथालये आणि माहिती केंद्रे पारंपारिक ज्ञान जतन करताना येणाऱ्या अडचणी यांचा या लेखात अभ्यास केला आहे.        
बीज शब्द :  पारंपारिक ज्ञान, प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा, डिजिटायझेशन, डिजिटल रिपॉझिटरीज, ज्ञानसंवर्धन,  हस्तलिखितांचे  संरक्षण.

प्रा.तानाजी शिवाजी माळी, डॉ.राहुल कल्याणराव देशमुख, डॉ. नवनाथ महादेव सरोदे,(2025); भारतीय ज्ञान प्रणालीच्या संवर्धनामध्ये ग्रंथालयाची भूमीका, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences,      ISSN(o): 2581-6241,  Volume – 8,   Issue –  4.,  Pp.28-34.        Available on –   https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/

  1. भारद्वाज, वासू (२०२४) भारतीय तत्वज्ञान: स्वरूप आणि सिद्धांत, विद्या बुक पब्लिशर्स,छ. संभाजीनगर.
  2. रायचौधरी एस.सी., (२००७) भारताचा सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहास, सुरजित प्रकाशन नवी दिल्ली.
  3. गायधनी,र.न. प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास, कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे.
  4. सतीश,कुलकर्णी (२०२४) प्राचीन भारतातील विज्ञान युग, बीज प्रकाशन पुणे.
  5. जगदीश, पाटील.(२०२४) प्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली, प्रशांत पब्लिकेशन्स, जळगाव
  6. International Council for Science, Science and Traditional Knowledge, Report from the ICSU Study Group on Science and Traditional Knowledge, Paper delivered to 27th General Assembly of ICSU, Rio De Janeiro, razil, September 2002, p 3 athttps://www.humanrights.gov.au/sites/default/files/content/social_justice/nt_report/ntreport08/pdf/chap7.pdf
  7. United Nations Permanent Forum on Indigenous Issues, Report of the Secretariat on Indigenous traditional knowledge, UN Doc E/C.19/2007/10. At: http://daccessdds.un.org/doc/UNDOC/GEN/N07/277/15/PDF/N0727715.pdf?OpenElement
  8. Ramesh C Gaur and Mrinmoy Chakraborty. Preservation and Access to Indian Manuscripts: A KnowledgeBase of Indian Cultural Heritage Resources for Academic Libraries. In Proceedings of ICAL 2009 – Vision And Roles Of The Future Academic Libraries, P90-98. At http://crl.du.ac.in/ical09/papers/index_files/ical-14_227_489_2_RV.pdf.
  9. Jyotshna Sahoo, Bismita Sahoo, Basudev Mohanty, Nrusingh Kumar Dash. “Indian Manuscript Heritage and the Role of National Mission for Manuscripts” (2013). Library Philosophy and Practice (e-journal). Paper 984. At: http://digitalcommons.unl.edu/libphilprac/984
  10. Mahadevan, B., Bhat R.V. (2024) Introduction to Indian Knowledge System, PHI Learning
  11. ignca.nic.in.
  12. https://razalibrary.gov.in/ retrieved at 24 Mar 2025.
  13. https://www.indiaculture.gov.in/khuda-baksh-oriental-public-library-patna retrieved at 24 Mar 2025
  14. https://www.asiaticsociety.org.in/ retrieved at 24 Mar 2025.
  15. https://www.crlindia.gov.in/ retrieved at 24 Mar 2025.

Download Full Paper

Download PDF No. of Downloads:4 | No. of Views: 79