29, July 2026

पालि साहित्यातील मानसिक आरोग्य संकल्पना: एक चिकित्सक आढावा

Author(s): रोहन मिलिंद सदांशिव

Authors Affiliations:

संशोधक विद्यार्थी, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती  द्वारा संचालित संशोधन केंद्र (२३५) मधुकरराव पवार कला महाविद्यालय मूर्तीजापूर. जि.अकोला

DOIs:10.2018/SS/202607006     |     Paper ID: SS202607006


Abstract
Keywords
Cite this Article/Paper as
References

शोध सार: पालि साहित्यातील मानसिक आरोग्य संकल्पना: एक चिकित्सक आढावा या साहित्य समीक्षा अभ्यासामध्ये पाली साहित्यातील मानसिक आरोग्याची संकल्पना आणि तिचे आधुनिक मानसिक आरोग्य विज्ञानाशी असलेले नाते यांचा आढावा घेण्यात आला आहे. पाली साहित्य हे केवळ धार्मिक ग्रंथसंपदा नसून ते मानवी दुःख निवारण आणि मानसिक शांती प्राप्त करण्याचा मार्ग दर्शवणारे तत्त्वज्ञान आहे. भगवान बुद्धांनी लोभ, द्वेष आणि मोह या मानसिक क्लेशांना दुःखाचे मूळ कारण मानून शील, समाधी आणि प्रज्ञा या त्रिशिक्षेच्या माध्यमातून मानसिक शुद्धीचा मार्ग स्पष्ट केला आहे. तसेच आधुनिक मानसिक आरोग्य संकल्पना माइंडफुलनेस आणि विपस्सना ध्यान यांचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. आधुनिक मानसशास्त्रात मानसिक आरोग्य हे ताण, चिंता व नैराश्य यांचे व्यवस्थापन म्हणून पाहिले जाते, तर पाली साहित्यामध्ये ते मनाची शुद्धी, सजगता आणि क्लेशमुक्त अवस्थेवर आधारित आहे.

  या अभ्यासातून असे स्पष्ट होते की माइंडफुलनेस आणि विपस्सना या दोन्ही संकल्पना आधुनिक मानसशास्त्र आणि बौद्ध तत्त्वज्ञान यांना जोडणारा पूल म्हणून कार्य करतात. म्हणूनच प्रस्तुत साहित्य समीक्षा या दोन्ही क्षेत्रांतील संकल्पनांचे एकत्रीकरण करून भविष्यातील संशोधनासाठी नवीन दिशा प्रदान करते आणि मानसिक आरोग्याच्या समग्र आकलनासाठी उपयुक्त ठरते.

मुख्य शब्द: पालि साहित्य, मानसिक आरोग्य, विपश्यना, त्रिपिटक.

रोहन मिलिंद सदांशिव (2026); पालि साहित्यातील मानसिक आरोग्य संकल्पना: एक चिकित्सक आढावा, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences,      ISSN(o): 2581-6241,  Volume – 9,   Issue –  7,  Available on –   https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/


Download Full Paper

Download PDF No. of Downloads:1 | No. of Views: 27