धम्मपदातील निवडक गाथांचे चिकित्सक अध्ययन. नैतिक, तात्त्विक व सामाजिक परिमाणे
Author(s): सत्यजीत दौलत इंगोले
Authors Affiliations:
संशोधक विद्यार्थी गाडगेबाबा अमरावती विद्यापिठ संचलित मधुकरराव पवार कला महाविद्यालय मुर्तीजापूर.
DOIs:10.2018/SS/202607005     |     Paper ID: SS202607005सारांश : पाली त्रिपिटकातील खुद्दकनिकाय अंतर्गत समाविष्ट असणारे ‘धम्मपद’ हे थेरवाद बौद्ध परंपरेतील केवळ धार्मिक ग्रंथ नसून, श्रमण परंपरेतील नैतिक, तात्त्विक व सामाजिक विचारसरणीचा मूळ गाभा आहे. धम्मपदा मध्ये ४२३ गाथा व २६ वग्गांमध्ये विभक्त असलेला हा ग्रंथ मानवी विचार, आचरण आणि मुक्तीच्या मार्गांचे विश्लेषण करतो. प्रस्तुत समीक्षा पेपरचा मुख्य उद्देश धम्मपदातील १५ वग्गांतील निवडक प्रतिनिधिक गाथांचे चिकित्सक, विषयनिष्ठ व तार्किक अध्ययन करणे हा आहे. अभ्यासात भावनत्मक दृष्टिकोन पूर्णपणे बाजूला ठेवून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धर्मानंद कोसंबी, राहुल सांकृत्यायन, भदंत आनंद कौसल्यायन, डॉ. वा. रा. काळसेकर व भालचंद्र मुणगेकर या भारतीय विद्वानांच्या चिकित्सक चौकटीचा वापर करण्यात आला आहे. यमकवग्गा पासून ते ब्राह्मणवग्गा पर्यंतच्या २६ वग्गांचे विश्लेषण करून, ग्रंथातील नैतिक स्वायत्तता, चेतना-केंद्रित कर्मवाद, वर्णव्यवस्थे वरची टीका आणि आधुनिक मानसशास्त्र, शांतता अभ्यास व सामाजिक न्यायातील त्याची प्रासंगिकता सिद्ध केली आहे. तसेच, ग्रंथातील वैयक्तिक नीतिशास्त्रावरील अगाउ भर आणि संस्थात्मक अन्यायाबाबतची अप्रत्यक्षता या मर्यादांवरही शास्त्रीय प्रकाश टाकला आहे.
सत्यजीत दौलत इंगोले (2026); धम्मपदातील निवडक गाथांचे चिकित्सक अध्ययन. नैतिक, तात्त्विक व सामाजिक परिमाणे, Shikshan Sanshodhan : Journal of Arts, Humanities and Social Sciences, ISSN(o): 2581-6241, Volume – 9, Issue – 7, Available on – https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/
![SHIKSHAN SANSHODHAN [ ISSN(O): 2581-6241 ] Peer-Reviewed, Referred, Indexed Research Journal.](https://shikshansanshodhan.researchculturesociety.org/wp-content/uploads/SS-TITLE-HEADER.png)